झाडं रात्री ऑक्सिजन का देत नाहीत?

झाडं दिवसा ऑक्सिजन देतात, पण रात्री का नाही? खरंच असं होतं का?

दिवसा झाडं प्रकाश संश्लेषण करतात. सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साइड वापरून अन्न तयार करतात.

 या प्रक्रियेत झाडं ऑक्सिजन सोडतात आणि आपल्याला ताज्या हवेत श्वास घेता येतो.

 दिवसा सूर्यप्रकाशात सुरू असणारी प्रकाश संश्लेषण क्रिया रात्री थांबते. रात्री झाडं अन्न तयार करत नाहीत. 

रात्री झाडं फक्त श्वसन (Respiration) करतात. म्हणजेच ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साइड सोडतात.

 काही झाडं मात्र अपवाद आहेत – जसे पिंपळ, वड, तुळस ही झाडे रात्रीही काही प्रमाणात ऑक्सिजन साेडतात. 

रात्री झाडं धोकादायक आहेत, ही अंधश्रद्धा आहे. रात्री झाडं फार कमी प्रमाणात CO₂ सोडतात.

घरातल्या झाडांमुळे (snake plant, aloe vera) रात्री ही हवा शुद्ध राहते. ही बेडरूमसाठी योग्य आहेत.

Click Here