IPL मध्ये जलदगतीने १००० धावा करणारे फलंदाज

फिल सॉल्टनं केली ट्रॅविस हेडच्या विक्रमाशी बरोबरी

पंजाब किंग्ज विरुद्धच्या पहिल्या क्वालिफायर लढतीत फिल सॉल्टनं नाबाद अर्धशकी खेळीसह संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

यंदाच्या हंगामातील चौथ्या अर्धशतकासह त्याने आयपीएलमध्ये कमी चेंडूत हजार धावांचा पल्ला गाठणाऱ्या ट्रॅविस हेडची बरोबरी केलीये.

आयपीएलमध्ये कमी चेंडूत १००० धावा करणाऱ्या बॅटर्समध्ये आंद्र रसेल टॉपला आहे. त्याने ५४५ चेंडूत हा पल्ला गाठला होता. 

ट्रॅविस हेडनं ५७५ चेंडूत आयपीएलमध्ये १००० धावा पूर्ण केल्या होत्या.

फिल सॉल्ट या यादीत आता संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे. ट्रॅविस हेडप्रमाणे त्यानेही ५७५ चेंडूत हा पल्ला गाठलाय. 

हेनरिच क्लासेन याने ५९४ चेंडूत आयपीएलमध्ये हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

या यादीत भारताचा माजी स्फोटक सलामीवीर सेहवाग पाचव्या स्थानावर आहे. त्याने ६०४ चेंडूत आयपीएलमध्ये १००० धावांचा पल्ला गाठला होता.

ग्लेन मॅक्सवेलनं आयपीएलमध्ये हजारीचा टप्पा गाडण्यासाठी ६१० चेंडूचा सामना केला आहे.

Click Here