तासगावातील रथोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा; दीड दिवसांचा असतो गणेशोत्सव

 दीड दिवसांचा गणपती म्हणजे तासगावच्या श्री गणपती पंचायतन संस्थानचा गणेशोत्सव.

या ठिकाणी रथोत्सव गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

रथातून मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. हा उत्सव दीड दिवसांचा असतो आणि या ऐतिहासिक रथोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे.

श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन हे गणेशभक्त होते. त्यांनी इ. स. १७७१ ते १७७९ या नऊ वर्षांच्या काळात तासगाव येथे सुंदर असे हेमाडपंथी गणेश मंदिर बांधले.

सन १७७९ मधे फाल्गून शुद्ध चतुर्थी या शुभदिनी उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाची प्रतिष्ठापना केली. लोकांनी या उत्सवात सहभागी व्हावे, यासाठी तेंव्हापासूनच तासगावमध्ये हा रथोत्सव उत्साहात साजरा होतो.

संस्थानिक पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष पुण्यश्‍लोक हरभट (बाबा) पटवर्धन हे एक अवतारी पुरुष होते. ते गणपतीपुळ्याच्या गणपतीचे भक्त होते. त्यांना सिद्धी प्राप्त झाली.

इ. स. १७७१ ते १७७९ या नऊ वर्षांच्या काळात तासगाव येथे सुंदर असे गणपती मंदिर बांधले.

परशुरामभाऊंनी विविध प्रदेशातील मंदिरांची पाहणी करुन हे मंदिर बांधले. कर्नाटकातून गवंडी, सुतार, शिल्पकार व राजस्थानातून चित्रकार आणले व मंदिराची उभारणी केली.

मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. समोर प्रवेशद्वार व देवस्थानची कचेरी आहे. पुढे पटांगण असून शेजारी सभागृह आहे. सात मजली ९६ फूट उंचीचे राज्यातील एकमेव गोपूर या मंदिराचे आहे. 

रथ ओढल्यामुळे मनोकामना पूर्ण होतात, अशी गणेशभक्तांची भावना असते. म्हणूनच भाविक रथावर मोठ्या भक्तीभावाने पेढे, नारळ, गुलाल, खोबर्‍याची उधळण करत रथ दोरखंडाच्या सहाय्याने ओढत नेतात. 

श्रींचा रथ गुरूवार पेठेतील काशी विश्‍वेश्‍वराच्या मंदिरापर्यंत ओढतात. मिती भाद्रपद शुद्ध पंचमीचे दिवशी दुपारी बरोबर एक वाजता या रथोत्सवास सुरवात होते. 

Click Here