रक्षाबंधन स्पेशल : हाेममेड मिठाई 

या वर्षीच रक्षाबंधन स्पेशल करण्यासाठी तुम्ही स्वतः या खास साेप्या मिठाई घरी करू शकता. तुमच्या नात्यातला गाेडवा नक्कीच वाढेल. 

गुळाचे नारळ लाडू. गॅसवर गूळ विरघळून घेऊन त्यात खाेबऱ्याचा चव टाकून शिजवून घ्या, वेलची पूड घाला. छान लाडू वळून घ्या. पाैष्टिक लाडू तयार. 

चाॅकलेट रवा लाडू. रवा लाडूंमध्ये काेकाे पावडर घालून लाडू तयार करा. बच्चेकंपनी नक्कीच खूष हाेतील. डार्क चाॅकलेट घालून गार्निश करा. 

शेवयांचा खीर राेल. गाेड शेवया ड्रायफ्रूट्स घालून शिजवून घ्या. पाेळीच्या राेलमध्ये घालून ते कापा. खीर न करता वेगळ्या पद्धतीने झटपट तयार हाेईल मिठाई. 

बेसनाचे पेढे किंवा लाडू करा. बेसन लाडू प्रमाणेच कृती करून छाेट्या आकाराचे पेढे वळू शकता. किंवा लाडू करून त्यावर काजू लावा. 

ड्रायफ्रूट बर्फी. दूध पावडर, साखर, ड्रायफ्रूट पेस्ट आणि थाेडं दूध घेऊन मिश्रण एकत्र करा. गॅस न वापरता मिश्रण मळून घेऊन बर्फी सेट करायला ठेवा. 

काेकणातला खास गाेड पदार्थ पिठलं लाडू. तांदुळाची पिठी, गुळ आणि नारळाचं दुध या तीन पदार्थांमध्ये तयार हाेणारे लाडू. 

मँगो श्रीखंड बाईट्स. श्रीखंड तयार करून घ्या. एका भांड्यात बिस्कीटांचा चुरा, त्यावर श्रीखंड आणि ड्रायफ्रूट्स घालून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा. 

खवा - पिस्ता माेदक. खवा थाेडा परतून घेऊन त्यात साखर, वेलची पूड घाला. मिश्रण थाेडं थंड झाल्यावर त्यात पिस्ते भरून माेदक वळा. 

Click Here