रक्षाबंधनाच्या दिवस हा बहिण - भावासाठी खास दिवस असताे. हा खास दिवशी चुकूनही तुम्ही या ५ वस्तू गिफ्ट म्हणून देऊ नका.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने राखी बांधल्यावर तिच्यासाठी खास गिफ्ट्स प्लॅन करत असाल, तर हे नक्की वाचा.
बहिण किंवा भावासाठी गिफ्ट्स घेताना एल्युमीनियची भांडी, वस्तू गिफ्ट्स म्हणून देऊ नका. त्यापेक्षा अन्य धातूंच्या भांड्याचा विचार करा.
चामड्याच्या वस्तू गिफ्ट्स म्हणून देऊ नका. चामड्याची बॅग किंवा पर्स देऊ नका. कारण, मंगलक्षणी चामड्याची वस्तू भेट देऊ नये.
धारदार वस्तू देणे टाळा. सुऱ्या, चाकू अशा वस्तू गिफ्ट्स म्हणून देऊ नका. या वस्तूंमुळे तुमच्या नात्यावर परिणाम हाेऊ शकताे.
लाेखंडाच्या वस्तू भेट देणे टाळा. यंदा रक्षांबधन शनिवारी आले आहे. शनिवारी लाेखंडाच्या वस्तू भेट म्हणून काेणाला देऊ नये.
रूमाल काेणालाही भेट म्हणून देऊ नयेत. रूमाल दिल्याने त्याचा परिणाम नात्यावर हाेऊ शकताे, असे मानले जाते. त्यामुळे ही वस्तू टाळा.
या पाच वस्तू साेडून अन्य काेणत्याही वस्तू तुम्ही या रक्षाबंधनाला भेटवस्तू म्हणून देऊ शकता.