आज उद्धव ठाकरे- राज ठाकरेंचा विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्यातील काही खास क्षण
आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा पार पडला. सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यावर या दोघांनी हा मेळावा आयोजित केला
राज ठाकरेंनी नेहमीप्रमाणे धारदार शब्दांनी सरकारवर ताशेरे ओढले. याशिवाय उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं
तब्बल २० वर्षांनी ठाकरे बंधू या मेळाव्यानिमित्त एकत्र आले. दोघांना एकाच मंचावर पाहणं हा सर्वांसाठी आनंदाचा क्षण होता
या विजयी मेळाव्याची खास गोष्ट अशी की, ठाकरेंची पुढची पिढी अर्थात अमित-आदित्य यानिमित्ताने पहिल्यांदा एकत्र दिसले
राज ठाकरेंच्या भाषण ऐकून सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला
संपूर्ण ठाकरे कुटुंबाला पहिल्यांदाच एकत्र बघून महाराष्ट्रातील तमाम जनतेला आनंद झालेला दिसला