इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी शतके झळकवणारे आघाडीचे ५ फलंदाज
इंग्लंडच्या मैदानात सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राहुल द्रविड सर्वात टॉपला आहे.
द्रविडनं २००२ ते २०११ या कालावधीत इंग्लंडमध्ये ६ शतके झळकावली आहेत. यात २००२ मध्ये ओव्हलच्या मैदानातील २१७ धावांच्या खेळीचा समावेश आहे.
सचिन तेंडुलकर ४ शतकासह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने १९९० मध्ये ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात इंग्लंडच्या मैदानातील पहिलं शतक झळकावले होते.
दिलीप वेंगसरकर यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत इंग्लंडमध्ये ४ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.
सौरव गांगुलीनं लॉर्ड्सच्या मैदानातील पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली होती. कसोटी कारकिर्दीत इथं त्याने ३ शतके झळकवल्याचा रेकॉर्ड आहे.
मोहम्मद अझरुद्दीन याने इंग्लंडच्या मैदानात २ शतके झळकावली आहेत.