१८ महिन्यांनी १८ मे २०२५ रोजी राहु आणि केतुचे गोचर होत आहे.
नवग्रहातील सर्वांत क्रूर, मायावी मानले गेलेले राहु आणि केतु २०२५ मध्ये १८ महिन्यांनी गोचर करणार आहेत.
१८ मे २०२५ रोजी राहु मीन राशीतून कुंभ राशीत आणि केतु कन्या राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे.
पुढील १८ महिने राहु आणि केतु याच राशीत असणार आहेत. त्यामुळे नेमके कोणते उपाय करावेत? जाणून घेऊया...
मेष: या राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या लोकांनी हनुमान चालीसा पठण करा. मंगळवारी मसूर दान करा.
वृषभ: या राशीचा स्वामी शुक्र आहे. दुर्गा सप्तशतीचे पठण करा, गोमातेला अन्नदान करावे.
मिथुन: या राशीचा स्वामी बुध आहे. गणपतीचे विशेष पूजन करावे. बुधवारी हिरव्या रंगाच्या वस्तू दान करा.
कर्क: या राशीचा स्वामी चंद्र आहे. शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. तेलाचे दान करा.
सिंह: या राशीचा स्वामी सूर्य आहे. कालसर्प दोषांवर उपाय करावा. महामृत्युंजय मंत्राचा जप करा.
कन्या: या राशीचा स्वामी बुध आहे. विष्णु सहस्रनामाचा पाठ करा. तुळशीला जल अर्पण करा.
तूळ: या राशीचा स्वामी शुक्र आहे. शनिवारी राहु-केतुच्या बीज मंत्राचा जप करा. काळ्या वस्तू दान करा.
वृश्चिक: या राशीचा स्वामी मंगळ आहे. महादेवाच्या मंदिरात जाऊन जल अर्पण करा. सोमवारी व्रत करा.
धनु: या राशीचा स्वामी गुरु आहे. भगवान विष्णूची पूजा करा, केळीच्या झाडाची पूजा करा.
मकर: या राशीचा स्वामी शनि आहे. शनिवारी शनि मंत्राचा जप करा. काळे तीळ दान करा.
कुंभ: या राशीचा स्वामी शनि आहे. राहु मंत्राचा जप करा. वाहत्या पाण्यात नारळ सोडावा.
मीन: या राशीचा स्वामी गुरु आहे. गुरु मंत्राचा जप करावा. गुरुवारी पिवळ्या वस्तू दान करा.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.