आर. माधवन आता ५५ वर्षांचा आहे. पण, अजूनही एकदम फिट आणि यंग कसा काय दिसताे, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना?
आर. माधवनने आपल्या अभिनयामुळे बाॅलिवूड आणि साऊथमध्ये आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे.
प्रत्येकवेळी आर. माधवन आपल्याया वेगवेगळ्या भूमिका तितक्याच ताकदीने करताना दिसताे.
माधवनचे तरूण दिसण्याचे सिक्रेट त्याच्या लाईफस्टाईलमध्ये दडले आहे. त्याने काेणत्याही प्रकारची स्कीन ट्रीटमेंट कधीच घेतली नाही.
आर. माधवन नॅचरल गाेष्टींचा आपल्या लाईफ स्टाईलमध्ये समावेश करताे, त्यामुळे ताे या वयातही यंग दिसताे.
सूर्य प्रकाशात जाणे माधवन कधीच टाळत नाही. सूर्य प्रकाशामुळे व्हिटॅमिन डी आणि एनर्जी मिळते.
ताजे अन्न माधवन नेहमी खाताे. शूटिंगला जातानाही त्याच्याबराेबर त्याचा शेफ असताे.
जेवणात डाळी, भाजी असे साधे जेवण ताे जेवताे. तळलेले पदार्थ ताे कमी प्रमाणात खाताे.