कशी आहे या दोघांची लव्हस्टोरी...
पुण्यात मोठ्या थाटात समलिंगी विवाह सोहळा पार पडला आहे. तो देखील तीन दिवस.
यापूर्वी २० वर्षांपूर्वी पुण्यात अशाप्रकारचा विवाह सोहळा पार पडला होता. तरी तेव्हाचा काळ वेगळा होता. प्रेमविवाहांनाच विरोध होत होता.
जगभरात एलजीबीटीक्यू समुदाय वाढत चालला आहे. यामुळे तेव्हाच्या काळापेक्षा आता तसा विरोध मावळलेला आहे.
पुण्यात ‘मिस्ट एलजीबीटीक्यू फाउंडेशन’चे सह-संस्थापक श्याम आणि राम हे जोडपे विवाहबद्ध झाले.
हा विवाह सोहळा पारंपरिक हिंदू आणि ख्रिश्चन विधींमध्ये पार पडला. महत्वाचे म्हणजे तीन दिवस हा सोहळा सुरु होता.
आधी दाक्षिणात्य हिंदू परंपरेनुसार विवाह करण्यात आला, मग ख्रिश्चन विधीनुसार... या विवाह सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
रामचे खरे नाव श्रीराम असे आहे, त्याचे वय ३२ वर्षे तर त्याच्या पार्टनरचे म्हणजेच शामचे खरे नाव सॅम्युअल कोन्नूर व वय ३६ वर्षे आहे.
१३ जून रोजी त्यांनी हा विवाह केला आहे. २०१५ मध्ये त्यांना आपण एकमेकांसाठीच बनलोय असे वाटू लागले.
शाम हा एका आईस्क्रीम शॉपमध्ये रामची वाट पाहत होता. तेव्हा काही चोरटे आले आणि त्यांनी शामचा मोबाईल हिसकावला व मारहाण केली.
राम जेव्हा आला तेव्हा तो त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिथून पुढे त्यांचे बोलणे वाढले आणि मग त्यांनी एकत्र येण्याचे ठरविले.
रामनेच शामला पहिल्यांदा प्रपोज केला. तेव्हा राम पुण्याला आला होता आणि शाम बंगळुरूमध्ये. दोन्ही आयटी कंपन्यांत काम करत होते.
गेल्या वर्षीच हे दोघे युरोपमधील एड्स परिषदेत सहभागी झाले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.