तुम्ही सुद्धा प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवताय भाज्या? होऊ शकतात हे गंभीर परिणाम
प्लॅस्टिकच्या पिशवीत भाजी ठेवण्याचे मोठे दुष्परिणाम आहेत.
अनेकदा आपण बाजारातून भाजी आणली की ती आहे तशीच प्लॅस्टिकच्या पिशवीसकट फ्रीजमध्ये ठेवतो. परंतु, या पिशवीत भाजी ठेवण्याचे मोठे दुष्परिणाम आहेत.
भाजी प्लॅस्टिकच्या पिशवीत बंद करुन ठेवल्यामुळे भाज्यांमधून बाहेर पडणारा नैसर्गिक ओलावा आत कोंडला जातो. ज्यामुळे पिशवीत दमट वातावरण तयार होऊन भाजीवर बुरशी तयार होते.
भाज्या नैसर्गिकरित्या इथिलीन नावाचा वायू सोडतात. ज्यामुळे भाजी नैसर्गिकरित्या पिकते. हा वायू पिशवीत कोंडल्यामुळे भाज्या गरजेपेक्षा जास्त पिकतात.ज्यामुळे त्या सडून जातात.
पिशवीत हवा खेळती न राहिल्यामुळे भाजीतील पोषक घटक नष्ट होतात.
प्लॅस्टिकची पिशवी तयार करतांना हानिकारक रसायनांचा वापर केला जातो. ज्यामुळे हे रसायन भाज्यांमध्येही उतरण्याची शक्यता असते.
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेल तर दैनंदिन जीवनात पाळा 'हे' नियम