पावसाळा आला, तयारी झाली का? ही घ्या यादी..

काही गोष्टी पावसाळा सुरू होण्याआधीच करायला हव्यात म्हणजे नंतर घाई होत नाही.

कोणताही ऋतु सुरू होण्याआधी थोडीफार तयारी करावी लागतेच. पण पावसाळा सुरू होण्याआधी जरा जास्त काळजी घ्यावी लागते. काही गोष्टी जर विसरत असाल तर पाहा काय तयारी बाकी आहे. 

पावसाळ्यात कपडे वाळतच नाहीत. दोन-दोन दिवस दमट राहतात. त्यामुळे वाळतील असे पातळ कपडेच वापरावेत. पावसाच्या दिवसात जिन्स सारखे जाड व घट्ट कपडे जास्त वापरुच नयेत. कॉटन वापरावे.   

छत्री, रेनकोट लवकर विकत घ्या. छत्रीशिवाय घराबाहेर पडणे शक्यच होत नाही. त्याची तयारी आधी करा. माळ्यावर टाकलेली छत्री आता खाली उतरवा. 

घराचे छत नीट आहे ना याची तपासणी करुन घ्या. भिंतीवर पाण्याचे ओघळ येणार नाहीत याची काळजी घ्या. पाण्याची झड घरात मारणार नाही यासाठी प्लास्टिक लावायचे.   

किराणा सामान दोन ते तीन महिन्याचे एकदाच भरून ठेवा. पाणी लागणार नाही आणि दमट होणार नाही अशा जागेत ते साठवायचे. 

आतापासूनच रोज गरम पाणी प्यायला सुरवात करा. पावसाळा म्हणजे आजारपण. लहान मुलांना जास्त त्रास होतो. त्यामुळे रोज गरम पाणी पिणे नक्कीच फायद्याचे ठरेल.

बाहेरचे विकतचे अन्न आणे आता काही महिन्यांसाठी टाळा. पावसाळ्यात उघड्यावरचे अन्न चांगले नसते. त्याचा पोटाला त्रास होऊ शकतो. 

Click Here