टॉप ५ मध्ये प्रियांश आर्य टापला
आयपीएलच्या १८ व्या हंगामात पंजाब किंग्जकडून पदार्पण करणाऱ्या प्रियांश आर्य याने खास छाप सोडलीये.
आरसीबी विरुद्धच्या फायनलमध्ये २४ धावां करताच एक मोठा विक्रम त्याने आपल्या नावे केला.
एका शतकासह १७ सामन्यात ४७५ धावांसह तो आता IPL इतिहासात पदार्पणातील हंगामात सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड प्लेयर ठरलाय.
याआधी अनकॅप्ड इंडियन प्लेयरच्या यादीत देवदत्त पडिक्कल अव्वल होता. २०२० च्या हंगामात त्याने ४४३ धावा काढल्या होत्या.
श्रेयस अय्यर या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. २०१५ च्या हंगामात त्याने ४३९ धावा केल्या होत्या.
तिलक वर्मानं २०२२ च्या हंगामात अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात पदार्पण करताना ३९७ धावा केल्या होत्या.
राहुल त्रिपाठीनं २०१७ मध्ये ३९१ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.