25 ते 45 वयोगटातील स्त्रियांनी करा 'या' हेल्थ टेस्ट

अनेक घरांमध्ये स्त्रियांच्या आरोग्याविषयी कधीच बोललं जात नाही. 

अख्खं कुटुंब, घर-संसार सांभाळणाऱ्या स्त्रिया बऱ्याचदा स्वत:च्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात.

अनेक घरांमध्ये स्त्रियांच्या आरोग्याविषयी कधीच बोललं जात नाही. मात्र, वयाच्या २५ ते ४५ वयोगटातील स्त्रियांनी काही महत्त्वाच्या आरोग्यविषयक चाचण्या करणं गरजेचं आहे.

आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक स्त्रिया आज पीसीओडी, पीसीओएस, ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना बळी पडतात. त्यामुळेच स्त्रियांनी कोणत्या हेल्थ टेस्ट कराव्यात ते पाहुयात.

स्त्रियांमध्ये रक्ताची कमतरता निर्माण झाल्यास त्यांना एनिमिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्त्रियांनी २ महिन्यातून एकदा सीबीसी आणि आर्यन टेस्ट नक्की करावी.

सध्या अनेक स्त्रिया पीसीओडीच्या समस्येने त्रस्त आहेत. त्यामुळे जर मासिक पाळीत अडथळा येत असेल तर LH,FSH, प्रोलॅक्टीन, फ्री अंड्रोजन इंडॅक्स, TSH 3G, आणि AAMH या चाचण्या कराव्यात.

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम स्त्रियांच्या आरोग्यावर होतोय. अनेक स्त्रियांमध्ये इन्फर्टीलिटीची समस्या निर्माण होते. स्त्रियांनी सीबीसी, थायरॉइड पॅनेल प्रोजेस्टेरॉन, रुबेल आयजीजी या चाचण्या कराव्यात.

वयाच्या चाळीशीनंतर अनेक स्त्रिया मोनोपॉजचा सामना करतात. यावेळी शारीरिक बदलांमुळे अनेकदा मूड स्विंग्स होतात. त्यामुळे या काळात ऑस्ट्राडिओल, एफएसएच, एफटी 4, टीएसएच थर्ड जनरेशन या टेस्ट कराव्यात.

सकाळी उठताच पोटात गॅस होतोय?असू शकतात 'या' आजाराचे संकेत...

Click Here