सध्याच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम अनेकांच्या आरोग्यावर झपाट्याने होत आहे.
यात खासकरुन टेक नेक ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. परंतु, टेक नेक म्हणजे नेमकं काय ते पाहुयात.
आजकाल प्रत्येकाच्या हातात सहज मोबाईल, लॅपटॉप दिसून येतो. मात्र, याचा परिणाम तुमच्या शरीराच्या ठेवणीवर होतोय.
सतत मोबाईलमध्ये पाहतांना मान खाली वाकून बसल्यामुळे मान, पाठ यांची मूळ ठेवण बदलली जातीये ज्यालाच टेक नेक असंही म्हटलं जातं.
लंडनमधील कन्सल्टेंट डर्मेटोलॉजिस्ट डॉ. डेरेक फिलिप्स यांच्या मते, जर तुमच्या मानेवर सुरकुत्या, सैलसरपणा किंवा बारीक लाइन्स तयार होत असतील तर वेळीच सावध व्हा.
जर तुम्ही सतत मोबाईल, लॅपटॉप पाहात असाल तर तुमच्या बसण्याची पद्धत बदला.
उन्हात जाण्यापूर्वी आवर्जुन मानेजवळील भागावर सनस्क्रीन लोशन लावा. उन्हाचा थेट मानेशी होणारा संपर्क टाळा.
पचनक्रिया वाढवणारे ५ सूप, नक्की ट्राय करा या रेसिपी