वय वाढतंय, पण रूप मात्र दिवसेंदिवस खुलतंय!
अभिनेत्री प्राजक्ता माळी आज टेलिव्हिजन, सिनेमा आणि ओटीटी विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.
विविध मालिका आणि चित्रपट यामधून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे.
तिचा लूक, बोलण्याची स्टाइल यामुळे ती तरुणांचा क्रश बनली.
प्राजक्ता माळी हिचा आज वाढदिवस आहे.
मनोरंजन विश्वातील विविध सेलिब्रिटींनीही प्राजक्ताला तिच्या या खास दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
प्राजक्ताचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ रोजी झाला होता.
प्रेक्षकांची लाडकी 'प्राजू' ३६ वर्षांची झाली आहे.
वय वाढत असलं तरी प्राजक्ताच्या चेहऱ्यावरचं तेज आणि सौंदर्य आजही तसंच आहे.