दिसायला लहान असणारी ही मिरी अत्यंत गुणकारी आहे.
मसाल्याच्या पदार्थामधील सगळ्यात तिखट पदार्थ म्हणजे काळी मिरी. दिसायला लहान असणारी ही मिरी अत्यंत गुणकारी आहे.
काळ्या मिरीमध्ये अँटी ऑक्सिडेंटचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
शरीरावर वा चेहऱ्यावर सूज येत असेल तर काळ्या मिरीचं सेवन करावं. यामुळे सूज कमी होते. तसंच चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासही मदत मिळते.
पोट जड वाटणे, गॅस होणे वा अपचन यांसारख्या समस्या जाणवत असल्यास काळी मिरी खावी. काळ्या मिरीमुळे अन्नपचन नीट होतं.
मेंटल हेल्थसाठी काळी मिरी आवर्जुन खावी. यामुळे मूड स्विंग्स होणे, कामावर लक्ष केंद्रित न होणे यांसारख्या समस्या दूर होतात.
सर्दी, खोकला झाला असेल तर काळी मिरपूडचं सेवन करावं. कफ पातळ करण्याचं काम मिरपूड करते.