Kitchen Hacks : बटाटे उकडतांना करा लिंबाचा वापर!

बटाटे उकडताना पाण्यात टाका लिंबाचा तुकडा अन् पाहा मॅजिक

दैनंदिन जीवनातील काम सहजसोपी आणि कमी वेळात व्हावी यासाठी प्रत्येक गृहिणी प्रयत्नशील असते. म्हणूनच, ती नवनवीन किचन हॅक्ससुद्धा ट्राय करत असते.

आज आपण बटाटे उकडतांना त्यात लिंबाची एक फोड टाकली तर त्याचा कसा फायदा होतो हे पाहुयात.

बटाटे उकडण्यापूर्वी गरम पाण्यात लिंबाच्या फोडी घाला आणि हे पाणी १० मिनिटे चांगलं उकळवा. त्यानंतर त्यात बटाटे घाला.

बटाट्यासोबत लिंबू घातल्यामुळे बटाटे ओव्हरकूक होऊन ते मधून चिरत नाहीत.

अनेकदा बटाटे उकडल्यानंतर ते काळे पडतात. परंतु, लिंबू घातल्यामुळे बटाटे काळे होत नाहीत.

बटाटे उकडतांना प्रेशर कूकर काळा पडतो. मात्र, लिंबू घातल्यामुळे कुकर अजिबात काळा पडत नाही.

केळी गोड आहेत की नाही कसे ओळखावे?

Click Here