ध्रुवीय बर्फाळ प्रदेशातील अस्वलांचा रंग पांढरा असताे, असे सहज सांगतात. प्रत्यक्षात त्या अस्वलांचा रंग काेणता असताे, माहिती आहे का?
ध्रुवीय अस्वलांचा रंग पांढरा नसताे. खरं म्हणजे त्यांच्या अंगावरचे केस हे पांढऱ्या रंगाचे नसून ते पारदर्शक असतात.
अस्वलांचे केस पांढरे असल्यामुळे त्यांच्यावर पडणारा प्रकाश हा परावर्तित हाेताे. त्यामुळे डाेळ्याला त्यांचा रंग पांढरा आहे, असा दिसताे.
बर्फाळ प्रदेशात पांढरं दिसणं हे camouflage आहे. त्यांच्या पांढऱ्या दिसण्यामुळे ते सहज शिकारी आणि शिकार दाेघांपासून लपतात.
अस्वलाच्या अंगावरचे केस फक्त पारदर्शक नाही, तर पोकळ (hollow) असतो. त्यामुळे उष्णता टिकवायला मदत होते.
अंगावरील पोकळ केसांखाली जाड चरबीचा थर असतो. जो उणे तापमानातसुद्धा शरीर उबदार ठेवतो.
कधी कधी ध्रुवीय अस्वलाचे केस हिरवे दिसतात. कारण त्यात सूक्ष्म शेवाळं (algae) वाढतात.
ध्रुवीय अस्वलाची त्वचा मात्र काळी असते. कारण, काळी त्वचा सूर्यप्रकाश शोषून शरीर उबदार ठेवते.
ध्रुवीय अस्वल खरं तर पांढरं नसतंच. ते निसर्गाच्या जादूमुळे पांढरं भासतं आणि निसर्गामुळे त्याचे कठीण परिस्थितीत ही संरक्षण हाेतं.