पावसाळ्यात एखादी राेड ट्रिप प्लॅन करताय का? मग ट्रिपला जाण्याआधी ही चेकलिस्ट एकदा नजरेखालून घाला, म्हणजे फुल ट्रिप एन्जाॅय करता येईल.
राेड ट्रिपला जाताना ठिकाण, दिवस हे सगळ ठरवून झालं की, या ट्रिपमध्ये एखादी गाेष्ट विसरून चालणार नाही, मग काेणत्या गाेष्टी पॅक करायच्या ?
गाडीच्या संदर्भातली सगळी महत्त्वाची कागदपत्र गाडीमध्ये ठेवायला विसरू नका. गाडीची सगळी कागदपत्र तुमच्याबराेबर असतील तर काहीच टेन्शन राहणार नाही.
राेड ट्रिप असेल, तरी सर्वात आधी गाडीचं पूर्ण चेकअप करून घ्या. गरज असल्यास सर्व्हिसिंग करून घ्या. म्हणजे मध्येच गाडी बंद पडण्याचं टेन्शन नाही.
गाडीचे ब्रेक, टायर, टायरमधली हवा, गाडीची बॅटरी हे सर्व नीट तपासून घ्या. या सर्व गाेष्टी निघायच्या एक दिवस आधी परत चेक करा.
इंजिन ऑइल, वायपरसाठी लागणारे पाणी, दारांचे लाॅक्स हे सगळं नीट तपासून खात्री करून घ्या.
तुम्ही ज्या रस्त्याने जाणार आहात, तिथे वाटेत हाॅटेल, धाबा, पेट्राेल पंप, स्वच्छतागृह हे सगळे आहे ना, किती अंतरावर आहे, याची माहिती करून घ्या.
गाडीमध्ये एक स्टेपनी, गाडीच्या दुरूस्तीसाठी लागणारे साहित्य, टाॅर्च, पाॅवर बँक, पाण्याची भरलेली एक बाटली हे साहित्य ठेवायला विसरू नका.
तुमच्या गाडीत फर्स्ट एड किट घ्यायला विसरू नका. त्याचबराेबर तुम्हाला काेणती औषध लागत असतील ती ही बराेबर घेऊन ठेवा.
सगळ्यात महत्त्वाची गाेष्ट म्हणजे तुमच्या बराेबर खाण्याचे पदार्थ ठेवा. घरी बनवलेले पदार्थ, पाण्याच्या बाटल्या घ्यायला विसरू नका.