५ वर्षांत १ लाखांचे झाले १.९ कोटी, गुंतवणूकदार मालामाल

पाच वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये १९०००% हून अधिक वाढ झाली आहे. 

कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाशी संबंधित पीजी इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सनं भरघोस परतावा दिला आहे. 

पीजी इलेक्ट्रोप्लास्टच्या शेअर्सनं अवघ्या पाच वर्षांत भागधारकांना श्रीमंत केलं आहे. पाच वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये १९ हजारांहून अधिक वाढ झाली आहे. 

शेअर्सनं पाच वर्षांत गुंतवणूकदारांच्या १ लाख रुपयांचं मूल्य १.९ कोटी रुपये केलंय. शेअर्सचा ५२ आठवड्यांतील उच्चांक १०५४.९५ रुपये तर, ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३३४ रुपये आहे.

कंपनीचा शेअर १७ जुलै २०२० रोजी ३.९६ रुपयांवर व्यवहार करत होता. २७ जून २०२५ रोजी बीएसईवर मल्टीबॅगर कंपनीचा शेअर ७६०.९५ रुपयांवर बंद झाला. 

जर एखाद्या व्यक्तीनं १७ जुलै २०२० रोजी पीजी इलेक्ट्रोप्लास्टच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर १ लाख रुपयांना खरेदी केलेल्या शेअर्सचं सध्याचं मूल्य १.९२ कोटी रुपये झालं असतं. 

गेल्या चार वर्षांत पीजी इलेक्ट्रोप्लास्टच्या शेअरमध्ये १७७१ टक्के वाढ झाली. या कालावधीत कंपनीचा शेअर ४०.६७ रुपयांवरून ७६०.९५ रुपयांवर पोहोचलाय.

टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Click Here