पेट्रोल पंप उघडणं सोपं काम नाही, प्रत्येकजण ते उघडू शकत नाही. पण जे ते उघडतात, त्यांची कमाई काय माहितीये?
देशात अनेक व्यवसाय आहेत, परंतु असाच एक व्यवसाय ज्यातून चांगलं उत्पन्न मिळतं ते म्हणजे फ्युअल पंप, ज्याला सामान्यतः पेट्रोल पंप म्हटलं जातं.
पेट्रोल पंप उघडणं सोपं काम नाही, प्रत्येकजण ते उघडू शकत नाही. पण जे ते उघडतात, त्यांची कमाई काय माहितीये?
पेट्रोल आणि डिझेलच्या प्रत्येक लिटरवर पंप मालकाला किती पैसे मिळतात याचं संपूर्ण गणित जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेट्रोल पंप उघडण्यासाठी खूप पैसे गुंतवावे लागतात हे खरं आहे.
या क्षेत्रात जटिल परवाना प्रक्रिया, प्रचंड गुंतवणूक आणि स्पर्धा ही सामान्य आहेत. जर तुम्ही या आव्हानांना तोंड देऊ शकत असाल, तर हा व्यवसाय दैनंदिन उत्पन्नाचा एक उत्तम स्रोत आहे.
ग्रामीण भागात पेट्रोल पंप उघडण्यासाठी किमान २० लाख रुपये आवश्यक असतात, तर शहरी भागात ४० ते ५० लाख रुपयांची गुंतवणूक सामान्य आहे. यामध्ये टाक्या, डिस्पेंसर आणि पायाभूत सुविधांचा खर्च समाविष्ट आहे.
शहरानुसार जमिनीची किंमत बदलू शकते, त्यामुळे किंमत देखील वाढू शकते. मोठ्या शहरांमध्ये १ कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक देखील शक्य आहे.
दिल्लीत एक लिटरपेट्रोलची किंमत ९४.७७ रुपये आहे. यात पंप मालकाला दिल्लीत प्रति लिटर पेट्रोल ४.३९ रुपये मिळतात.
दिल्लीत डिझेलची किंमत ८७.६७ रुपये आहे. यातून मालकाला कमिशन म्हणून ३.०२ रुपये प्रति लिटर मिळतात. यातून मालकाला कर्मचाऱ्यांचा खर्च आणि इतर खर्च भागवावा लागतो.
चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?