उशीशिवाय झोपल्यामुळे शरीराला त्याचे अनेक फायदे मिळतात.
झोपताना प्रत्येकालाच डोक्याखाली उशी लागते. यात काही लोकांना तर उशीशिवाय झोपच येत नाही. पण असं करणं आरोग्यासाठी नुकसानकारक असतं.
उशीशिवाय झोपल्यामुळे शरीराला त्याचे अनेक फायदे मिळतात. त्यामुळे झोपतांना कधीच डोक्याखाली उशी घेऊ नये.
उशीचा वापर केल्याने मान आणि पाठीच्या कण्याचा तणाव वाढतो. त्यामुळे अनेकदा मानेचा त्रास व्हायला लागतो. त्यामुळे उशी न वापरणे हा चांगला पर्याय ठरू शकतो.
उशीचा सतत वापर केल्याने त्वचेवर सुरकुत्या पडू शकतात. कारण उशीमुळे चेहऱ्यावर दबाव पडतो. तसंच उशीचे कव्हर नेहमी धुतले जात नाहीत, त्यामुळे त्यातील धुळ कण यांमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात.
डोक्याखाली उशी घेतल्यामुळे पाठीच्या कण्याची स्थिती बदलते. ज्यामुळे पाठदुखीची समस्या निर्माण होते.