पेंग्विन हा पक्षी आहे, त्याला पंख असतात. पण, तरीही पेग्विंन उडत का नाही? मग पेंग्विन पंखांचा उपयाेग कशासाठी करताे?
पेंग्विनला पंख असतात. पण, त्या पंखांची रचना अशी आहे की, त्याला उडता येत नाही. पण, त्या पंखांचा वापर ताे दुसऱ्या कामासाठी करताे.
पेंग्विनचे पंख हे फ्लिपरसारखे बनले आहेत. त्यामुळे या पंखांच्या सहाय्याने पेंग्विन वेगात पाेहू शकताे.
पेंग्विनच्या शरीराची रचना अशी असते की, ते पाण्यात कमाल गतीने पोहू शकतात.
पेंग्विनचं शरीर जाड असतं. त्यांची हाडं मजबूत आणि जड असल्यामुळे ते हवेत उडू शकत नाहीत.
पेंग्विनची घट्ट पिसं, चरबीचा थर आणि पंखांची रचना हे सगळं उडण्यासाठी नव्हे तर थंड समुद्रात टिकण्यासाठी आहे.
पेंग्विन पाण्यात ताशी ३५ किमी वेगाने पोहू शकतात. पेंग्विन हे समुद्रातील पक्षी-पायलट आहेत.
पेंग्विन हे पक्षी असून उडू शकत नाहीत. पण, तरी पेंग्विन एकत्र राहतात, घरटं बांधतात आणि पिल्लांची काळजी घेतात.
पेंग्विन यांनी उडण्याची क्षमता गमावली असली तरी त्यांनी समुद्रात जगण्यासाठीची कला त्यांना अवगत आहे.
अंटार्क्टिका, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि आर्जेंटिना येथे पेंग्विन वसाहती आहेत.