स्टायलिश लूकसह या गोष्टींचीही रंगतीये चर्चा
आयपीएल स्पर्धेतील पंजाब किंग्जच्या सामन्यावेळी संघाची सह मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा लक्षवेधी ठरते.
स्टेडियमवर उपस्थितीत राहून ती संघाला चीअर करताना दिसतेच. याशिवाय मॅचनंतर ती खेळाडूंसोबत गप्पा गोष्टी अन् खास फोटो सेशनसह मैफिल लुटताना दिसते.
प्रीती झिंटानं आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या खास फोटोंमध्ये तिने कोच रिकी पाँटिंगसोबतचाही एक खास फोटो शेअर केल्याचे दिसते.
पंजाब किंग्ज संघाचा नवा हिरो प्रियांश आर्य याच्यासोबत प्रीतीचा हा फोटोही सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला.
PBKS च्या संघातील लंबूजी मार्को यान्सेनसोबतची ही फ्रेमही एकदम खास आहे.
नेहल वढेरा याच्यासोबत खास गप्पा गोष्टीनंतर क्लिक केलेला हा फोटोही प्रीतीनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केल्याचे दिसते.
प्रीती झिंटा मॅच वेळी आपल्या स्टाइल स्टेंटमेंटची खास झलकही दाखवताना दिसते.
ती फक्त आपल्या संघातील खेळाडूंनाच भाव देते असं नाही. चाहत्यांसोबतही ती फोटो क्लिक करताना पाहायला मिळते. तिची हीच गोष्ट अनेकांना भावते.