पालकांच्या 'या' सवयी मुलांसाठी घातक!

लहान मुलं पालकांकडे पाहून अनेक गाेष्टी शिकत असतात. पालकांच्या सवयी ते आत्मसात करत असतात. मुलांवर कसा परिणाम हाेताे, माहिती आहे का?

मुलांना सारखे ओरडल्यामुळे, मारल्यामुळे त्यांच्या मनात भीती निर्माण हाेते. त्यांचा काॅन्फिडन्स कमी व्हायला लागताे. 

स्वतःच्या मुलांची दुसऱ्यांबराेबर सातत्याने तुलना करू नका. यामुळे मुलांमध्ये inferiority complex वाढताे. मानसिक ताण वाढताे.

मुलांवर अति जास्त प्रमाणात अपेक्षांचे ओझे टाकणे. मुलांच्या क्षमतांचा विचार न करता, त्यांच्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे.

मुलांसमाेर दाेन्ही पालक सातत्याने भांडत असतील, तर मुलांवर याचा परिणाम हाेताे. मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण हाेते. 

मुलांना वेळ न देणे. बिझी शेड्यूलमधून मुलांसाठी वेळ काढत नसाल, तर मुलांना एकटेपणाची भावना मनात निर्माण हाेते. 

आई - वडिल छाेट्या छाेट्या गाेष्टींसाठी मुलांसमाेर खाेटं बाेलतात. मुलांना ही गाेष्ट कळते, तेव्हा त्यांना खाेटं बाेललेलं चालत असे वाटते. 

अनेकदा पालक मुलांना चुकांसाठी ओरडणे टाळतात. पण, याचा गंभीर परिणाम मुलांवर हाेताे. चांगल वाईट यातला फरक मुलांना कळत नाही.

पालकांनी आर्थिक गाेष्टी सातत्याने मुलांसमाेर बाेलणे टाळावे. आर्थिक संकट असल्यास मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम हाेताे.

Click Here