मुलांना स्वावलंबी करण्यासाठी पालकांनी फॉलो करा 'या' टिप्स
पालकांनी या गोष्टींचं पालन केलं तर तुमची मुलं नक्कीच होतील स्वावलंबी
लहान मुले आपल्याकडे पाहून दररोज नवनवीन गोष्टी शिकत असतात. यात काही गोष्टी अशाही असतात ज्या आपण त्यांना शिकवाव्या लागतात.
आपलं बाळ लहानसहान गोष्टींसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू नये यासाठी पालकांनीच त्याला काही गोष्टी शिकवणं गरजेचं आहे.
मुलांना किरकोळ कामाची सवय लावा. अगदी त्यांच्या खेळणी उचलणं, जेवणाचं ताट स्वयंपाक घरात ठेवणं. यांसारखी काम त्यांची त्यांना करु द्या.
मुलांना स्वत:चे लहान लहान निर्णय घेऊ द्या. उदा. त्यांना रिकाम्या वेळात अभ्यासाचं पुस्तक वाचायचं आहे की गोष्टींचं हे त्याला ठरवू द्या. यामुळे मुलांमध्ये हळूहळू निर्णयक्षमता निर्माण होते.
मुलांना वेळेचं महत्त्व पटवून द्या. एखादं काम वेळेत पूर्ण करणं किती गरजेचं आहे हे त्यांना सांगा. तसंच वेळ निघून गेल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हे देखील त्यांना सांगा.
जर मुलांकडून एखादी चूक झाली तर त्यांना ओरडू नका. त्याऐवजी ते कुठे चुकले हे दाखवा. ज्यामुळे त्यांना त्यांच्या चुका स्वीकारण्यास आणि त्या सुधारण्यास वाव मिळेल.
जर मूल स्वत:हून काही शिकायचा प्रयत्न करत असेल तर त्यांना ते करु द्या. घरात पसारा होतो म्हणून ओरडू नका. जर तुम्ही त्यांना सतत ओरडत राहिलात तर भविष्यात ते कोणताही निर्णय घेतांना घाबरतील.
UPपासून ते तामिळनाडू पर्यंत! वेगवेगळ्या राज्यात पत्नीला कोणत्या नावाने मारतात हाक?