'पंचायत'गाजलेल्या सीरिजमध्ये 'विधायक'च्या मुलीचीही झलक दिसली
पंचायत सीरिज जोरदार गाजत आहे. आताच आलेल्या सीरिजच्या चौथ्या सीझनमध्ये विधायकच्या मुलीने चित्रा या भूमिकेतून लक्ष वेधून घेतलं
पंचायत च्या तिसऱ्या सीझनमध्येही ती दिसली होती.
नव्या सीझनमध्ये प्रधानजींची लेक रिंकी विरुद्ध विधायकची लेक चित्रामध्ये कचोरीवरुन भांडण दाखवलं होतं
ही भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे किरणदीप कौर सरन
किरणदीपने आपल्या छोट्याशा भूमिकेतूनही प्रेक्षकांचं मन जिंकलं.
किरणदीपने 'पंचायत'आधी 'स्कॅम २००३' आणि टीव्हीएफ च्या एका सीरिजमध्येही अभिनय केला होता
अमिताभ बच्चन यांच्यासोबतही तिने स्क्रीन शेअर केली आहे.
किरणदीपला 'पंचायत'च्या पुढच्या सीझनमध्ये बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत