ट्रक ड्रायव्हरची मुलगी गाजवतेय ओटीटी विश्व!



प्रेक्षकांच्या आवडत्या 'पंचायत' वेब सीरिजचा चौथा भाग नुकताच भेटीला आहे. 

फुलेरा गाव तसेच तेथील गावकरी आणि सचिव-प्रधानची गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 

या सीरीजमध्ये कलाकारांनी केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. 

दरम्यान, 'पंचायत ४' मध्ये अभिनेत्री सुनीता राजवारने आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं. 

यामध्ये सुनीता राजवार या बनराकसची पत्नी क्रांती देवीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

विविध मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या या अभिनेत्रीला सुरुवातीला प्रचंड संघर्ष करावा लागला. 

सुनीता या एका सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांच्या कुटुंबाचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नव्हता. 

एका मध्यमवर्गीय कुटुंबात सुनीता राजवार यांचा जन्म झाला. त्यांचे वडील ट्रक ड्रायव्हर होते तर आई गृहिणी होती. 

सध्याच्या घडीला ओटीटी विश्वात सुनीता राजवार हे नाव लोकप्रिय आहे. 

Click Here