'पंचायत'मध्ये प्रल्हाद चा ही भूमिका साकारून अभिनेता फैसल मलिकने प्रसिद्धी मिळवली.
'पंचायत' ही ओटीटीवरील सगळ्यात गाजलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या वेब सीरिजपैकी एक आहे.
नुकतंच 'पंचायत'चा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
त्याने साकारलेली भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली. पण, अभिनयात करिअर करणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं.
अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आल्यानंतर त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.
सुरुवातीला त्याला रस्त्यावर राहून दिवस काढावे लागले. तर रात्री रेल्वे स्टेशनवर झोपण्यासाठी तो १० रुपये द्यायचा.
पण, हा स्ट्रगल महत्त्वाचा असल्याचं फैसलने म्हटलं होतं.