जगातील सर्वात श्रीमंत मंदिर; तळघरात दडलाय खजिना...
मंदिराचा खजिना किती मोठा आहे, हे आजही एक गूढ आहे.
भारतात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. ही त्यांच्या भव्यतेसाठी ओळखली जातात. केरळचे श्री पद्मनाभस्वामी मंदिर हे भगवान विष्णूचे अवतार भगवान पद्मनाभस्वामी यांना समर्पित आहे.
पद्मनाभस्वामी म्हणजे, ज्याच्या नाभीत कमळ आहे. असे मानले जाते की या ठिकाणी भगवान विष्णूची मूर्ती सापडल्यानंतर येथे मंदिर बांधले गेले. हे मंदिर कला आणि भव्यतेचे प्रतीक आहे.
हे मंदिर केरळ आणि द्रविड शैलींचे मिश्रण असलेल्या स्थापत्य शैलीत बांधले गेले आहे. या मंदिराचा इतिहास ८ व्या शतकाचा असल्याचे मानले जाते.
मात्र, मंदिराचे सध्याचे स्वरुप १८ व्या शतकात त्रावणकोर महाराजा मार्तंड वर्मा यांनी बांधले आहे. येथे, भगवान विष्णूची १८ फूट लांबीची मूर्ती शेषनागावर झोपलेल्या अवस्थेत आहे.
स्वामी पद्मनाभांचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरून भाविक केरळच्या या मंदिरात येतात. या मंदिरात एक प्रचंड खजिना आहे. हा खजिना मंदिराच्या खाली बांधलेल्या तळघरांमध्ये आहे.
मंदिराचा खजिना किती मोठा आहे, हे आजही एक गूढ आहे. त्याच्याशी संबंधित पौराणिक कथा लोकप्रिय आहेत.
२०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिराच्या तळघराची तपासणी करण्यात आली. यात अंदाजे १ लाख कोटी रुपये किमतीचा खजिना सापडला.
तपासणीदरम्यान ६ तळघर सापडे, परंतु सर्वांची तपासणी करता आली नाही. खजिन्याबद्दल एक पौराणिक श्रद्धा आहे, ज्यामुळे आजपर्यंत कोणालाही त्याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही.
पौराणिक मान्यतेनुसार, हा खजिना अलौकिक देवता आणि नागांनी संरक्षित केलेला आहे. अशा परिस्थितीत, जो कोणी ते उघडण्याचा प्रयत्न करेल त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल.