विकतचं पाकिटातील दूध सतत तापवल्यावर त्याचा आरोग्यवर परिणाम होतो.
पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या दारासमोर गाई-म्हशी होत्या. त्यामुळे लोकांना ताजं दूध मिळायचं. परंतु, आता पिशवीतील दूध खरेदी करण्याशिवाय पर्याय नाही.
पिशवीतलं दूध खरेदी केल्यानंतर आपण ते तापवून घेतो. परंतु, हे दूध वारंवार तापवल्यामुळे त्याच्यातील पोषकतत्व नष्ट होतात. तसंच त्याचे काही तोटेही पाहायला मिळतात.
दूध जास्त गरम केल्यामुळे त्याच्यातील प्रोटीन कमी होतात.
दूध वारंवार तापवल्यामुळे दुधातील व्हिटामिन B नष्ट होतं.
दूध वारंवार गरम केल्याने लॅक्टिक ॲसिड मोठ्या प्रमाणात तयार होतं, त्यामुळे दूध आंबट होऊ लागतं.
जर दूध मोठ्या आचेवर गरम केलं तर त्याचं तापमान अचानक बदलतं, ज्यामुळे त्याचे प्रोटीन जमा होऊ लागतात आणि दूध फाटतं.