फिटनेस हा शब्द सर्रास वापरला जाताे. फिटनेससाठी हे हे केलं पाहिजे, अशी एक लिस्ट नेहमी तयार असते. पण, हे आपले गाेड गैरसमज आहेत.
फिटेनससाठी मी आता वेटलाॅस करणार आहे. पण, वेटलाॅस करणं म्हणजे फिट हाेणं हा सर्वांत माेठा गैरसमज आहे. वजन कमी करून फिट हाेता येत नाही.
घरातली सगळी कामं करते, अजून फिटनेस साठी वेगळा व्यायाम कशाला करायचा? असा विचार करणं चूक आहे. घरच्या कामांमुळे व्यायाम हाेत नाही.
राेज अर्धा तास चालताे, त्यामुळे माझा चांगला व्यायाम हाेता. फक्त अर्धा तास चालून तुम्ही फिट राहू शकणार नाही.
तुमचा फिटनेस आणि वजन याचा काहीही संबंध नसताे. वजन नियंत्रणात आहे, म्हणजे तुम्ही फिट आहात असे नाही.
तरूण आहात तर आता या वयात तुम्हाला व्यायाम करण्याची गरज नाही. हा माेठा गाेड गैरसमज आहे. त्यामुळे सर्वांना व्यायामाची गरज असते.
तुम्ही जिममध्ये जाऊन फक्त वेट उचलता म्हणजे तुमचा फिटनेस चांगला आहे. हा देखील एक गैरसमज आहे. फिटनेससाठी अनेक गाेष्टी लागतात.
आता तुमच्या फिटनेसाठी तुम्ही काय करू शकता,? तर, आठवड्यातले किमान ३ दिवस तरी व्यायामासाठी वेळ काढा. तुम्ही फिट राहण्यासाठी इतक नक्की करा.