एकही डिग्री नाही, बनले जगातील दुसरे श्रीमंत

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मोठा बदल झालाय. 

८० वर्षीय लॅरी एलिसन अॅमेझॉनचे जेफ बेझोस यांना मागे टाकत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. 

 एलिसन हे सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकलचे संस्थापक असून त्यांची नेटवर्थ २५८.८ अब्ज डॉलरवर पोहोचली. मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांची संपत्ती ४१०.८ अब्ज डॉलर आहे. 

जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आता मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग आहेत आणि त्यांची संपत्ती २३५.७ अब्ज डॉलर आहे. 

लॅरी एलिसन यांचा जन्म १९४४ साली न्यूयॉर्कमध्ये झाला. लॅरी एलिसन यांचं पूर्ण नाव लॉरेन्स जोसेफ एलिसन आहे. ते ९ महिन्यांचे असताना त्यांच्या आईनं त्यांना दत्तक दिलं.

लॅरी एलिसन यांच्याकडे कोणतीही पदवी नाही. याचं कारण म्हणजे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण मध्येच सोडलं. १९६६ मध्ये लॅरी एलिसन शिकागो विद्यापीठात पुन्हा रुजू झाले, पण नंतर त्यांनी तेही सोडलं.

लॅरी एलिसन कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग शिकले आणि अॅम्पेक्स नावाच्या कंपनीतही काम केलं, नंतर त्यांनी या क्षेत्राबद्दल अधिक जाणून घेतलं.

राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.

त्यांनी यादरम्यान रिलेशनल डेटाची संकल्पना शिकली, त्यानंतर एलिसन यांनी ओरॅकल कंपनी सुरू केली.

Click Here