हिंदी वेबसीरिजमुळे सध्या चर्चेत आहे अभिनेता
'धर्मवीर'आणि 'धर्मवीर २' या गाजलेल्या सिनेमांमध्ये एकनाथ शिंदेंच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता क्षितीश दाते
क्षितीशने या भूमिकेत स्वत:ला झोकून दिलं. त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.
क्षितीश सध्या 'मिस्त्री' या हिंदी वेब सीरिजमध्ये झळकत आहे. राम कपूर आणि मोना सिंहसोबत त्याने स्क्रीन शेअर केली आहे
क्षितीश दातेची बायकोही अभिनेत्रीच आहे. तिचं नाव ऋचा आपटे. २०२१ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.
'दिल दोस्ती दुनियादारी','बन मस्का','असं माहेर नको गं बाई', 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकांमध्ये ती दिसली आहे.
ऋचा सोशल मीडियावर अनेक कॉमेडी रील्सही शेअर करत असते. ऋचाने काही मराठी नाटकांमध्येही काम केलं आहे