कांदा चिरताना हमखास हाेणारा त्रास म्हणजे डाेळ्यात पाणी येणं. कांदा भल्याभल्यांना रडवताे असे गंमतीने ही म्हटले जाते.
कांदा चिरताना फक्त कांदा चिरणाऱ्या व्यक्तीच्या डाेळ्यात नाही, तर आजूबाजूच्या व्यक्तींच्या डाेळ्यातही पाणी आणताे.
कांद्याचा सगळ्यांना रडवण्याचा स्वभाव का असताे? यामागे असणारे शास्त्रीय कारण तुम्हाला माहिती आहे का?
कांदा चिरताना त्याच्या पेशी तुटतात. या पेशींमध्ये एन्झाइम्स आणि सल्फर कंपाऊंड्स लपलेले असतात.
कांद्याच्या पेशी तुटल्यावर त्यातून सिन - प्राेपेनेथियल - एस - ऑक्साईड नावाचा वायू तयार हाेताे.
कांदा चिरल्यावर तयार हाेणारा वायू हवेत पसरताे. हा वायू डाेळ्याच्या पृष्ठभागावर पाेहचला की पाणी मिसळून एक प्रकारचे आम्ल तयार हाेते.
आम्लाचा डाेळ्यांना त्रास हाेताे. डाेळे संरक्षणासाठी पाणी म्हणजे अश्रू तयार करतात.
कांदा चिरताना डाेळ्यांच अश्रू येणे ही डाेळ्याची Self - defense system असते.
कांदा चिरण्याआधी फ्रिजमध्ये ठेवल्यास डाेळ्यातून पाणी काढत नाही. डाेळ्यांना त्रास हाेत नाही.
कांदा चिरण्याआधी ताे पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यावा. किंवा धारदार सुरीने कांदा चिरावा.