आज स्वयंपाकाला काय? या प्रश्नाने गृहिणी, एकटे राहणारे बॅचलर्स कंटाळलेले असतात. राेजच्या या प्रश्नाला पर्याय म्हणजे 'वन पाॅट मिल'.
जेवण करायचे म्हणजे सगळ्यांच्या आवडी-निवडी लक्षात घ्या. एकटं राहाताना राेज जेवण करायचा देखील कंटाळा येताे. मग हे पर्याय तुमच्यासाठी.
दहीबुत्ती करा. भात तयार करून घ्या. त्यावर दह्याची फाेडणी घाला. फोडणीत चणा डाळ, उडीद डाळ, शेंगदाणे, कडीपत्ता, हिंग, जिरे घाला.
मिक्स व्हेज दालखिचडी. हा एक हेल्दी पर्याय आहे. तुमच्या आवडीच्या भाज्या, डाळ - तांदुळ, त्याच्यात बेसिक मसाले घालून तीन पट पाणी घालून शिजवा.
थालीपीठ. भाजणीच थालीपीठ, उपवसाची भाजणी, तुमच्याकडे असणाऱ्या पिठांमध्ये कांदा, काकडी घालून थालीपीठ लावा. बराेबर दही, लाेणी, लाेणच खा.
दलिया. तिखट किंवा गाेड करू शकता. तिखट दलियामध्ये भाज्या घालून करू शकता. गाेड करताना हेल्दी करण्यासाठी गुळाचा वापर करा.
पराठा. भाज्या, पनीर किंवा नुसते मसाले वापरून गव्हाच्या पिठाचे पराठे करू शकता. याबराेबर दही, साॅस किंवा लाेणचं घेऊ शकता.
वरण फळं. मसालेदार आमटी करून त्यात कणकेच्या पातळ चकत्या साेडून शिजवून घ्या. भरपूर सारं तूप घालून गरमागरम वरण फळ खा.
तिखट मिठाच्या पुऱ्या. जेवणाचा कंटाळा आला असेल, तर चटपटीत पटकन हाेणाऱ्या तिखट मिठाच्या पुऱ्या हा पर्याय चांगला आहे.