आज तप्त वाळूचं राज्य असलेली ही जागा एकेकाळी हिरव्यागार जंगलाने व्यापली होती.
जगातील सर्वात मोठं वाळवंट म्हणजे आफ्रिकेतील सहारा वाळवंट. जवळपास ९४०० वर्ग मील इतक्या विस्तीर्ण जागेत हे वाळवंट पसरलं आहे.
सहारा वाळवंटात दूर-दूरपर्यंत फक्त वाळू आणि वाळूच दिसून येते.परंतु, आज तप्त वाळूचं राज्य असलेली ही जागा एकेकाळी हिरव्यागार जंगलाने व्यापली होती हे माहितीये का?
एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, साधारणपणे 6 ते 7 हजार वर्षापूर्वी या जागेवर धबधबे, भरपूर झाडे होती. याविषयी नॅशनल जिओग्राफीनेदेखील एक रिपोर्ट तयार केला होता.
शिकागो युनिव्हर्सिटीच्या एका रिसर्च टीमने केलेल्या सर्वेक्षणामध्ये सहाराच्या वाळवंटात प्राणी, मासे आणि मगर यांचे अवशेष सापडले होते. यावरुन त्याजागी प्राण्यांसाठी पोषक वातावरण होतं.
इतिहासकार आणि संशोधनकर्त्यांच्या अभ्यासानुसार, सहारा एका दिवसात वाळवंट झालेला नाही. तर त्यासाठी बरीच वर्ष लागली आहेत.
काही रिसर्चच्या माहितीनुसार, ग्लोबल वॉर्मिंगमुळे हा बदल झाला आहे. ज्यामुळे हिरव्यागार जंगलाचं रुपांतर इतक्या मोठ्या वाळवंटात झालं.
चाळीशीनंतरही चष्मा लागणार नाही, फक्त या ४ गोष्टी खायला सुरुवात करा!