समुद्रात राहणाऱ्या ऑक्टाेपसची रचना तशी वेगळी असते. ऑक्टाेपसला एकूण ३ हृदय असतातत. हे तुम्हाला माहिती आहे का?
समुद्रात राहणाऱ्यांमध्ये राहणारा ऑक्टाेपस हा फक्त २ ते ३ वर्ष जगताे. पण, ताे अन्य समुद्रातील जीवांपेक्षा वेगळा आहे.
ऑक्टाेपसची २ हृदय ही ताे श्वसनासाठी वापरताे. तर, त्याच तिसरं हृदय त्याच्या सर्व शरीराला रक्त पुरवठा करण्याचे काम करताे.
सर्व प्राण्यांच रक्त हे लाल रंगाचं असतं. पण, ऑक्टाेपसचे रक्त निळ्या रंगाचे असते. कारण, त्याच्या रक्तात तांबे (काॅपर) असते.
ऑक्टाेपसकडे एकूण ९ मेंदू असतात. एक मुख्य मेंदू डाेक्यात असताे आणि ८ मेंदू त्याच्या हातात असतात.
ऑक्टाेपसला ८ हात असतात. पण, प्रत्येकाचे काम स्वतंत्र असते. या प्रत्येक हातात मेंदूसारखी नाडी असते.
ऑक्टाेपस एका सेकंदात त्वचेचा रंग बदलताे. समुद्रातील खडक, वाळू, शेवाळं यांच्याप्रमाणे ताे स्वतःचा रंग बदलताे.
ऑक्टाेपसच्या शरीरात हाडं नसतात. त्यामुळे ताे एका छाेट्या छिद्रातूनही बाहेर जाऊ शकताे.
ऑक्टाेपसला राग आला, आनंद, उत्साह वाटला तरी रंग बदलताे. रंग बदलातून ताे भावना व्यक्त करताे.