...अशाने मुलं मोबाईल सोडून पुस्तक वाचतील

घरातल्या माेठ्यांपासून लहान मुलापर्यंत सगळ्यांच्या हातात माेबाईल, टॅब दिसतात. पण, पुस्तकं दिसत नाहीत. पुढील टिप्समुळे हे चित्र नक्कीच बदलेल. 

घरातल्या मोठ्यांचे अनुकरण लहान मुलं करतात. मुलांना पुस्तकांची गाेडी लावायची असल्यास आधी पालकांनी पुस्तकं वाचनासाठी वेळ दिला पाहिजे. 

सहा-सात महिन्याच्या बाळांना चित्रांची पुस्तके दाखवू शकताे. राेज ५ मिनिटे पुस्तकातली चित्रे दाखवून त्या चित्रांविषयी बाेलणे पुरेसे आहे. 

लहान वयातच खेळण्यांच्या बराेबरीने मुलांसाठी पुस्तक खरेदी केल्यास, मुलांना पुस्तकांची ओळख हाेते. स्वतः मुलांना पुस्तके हाताळायला द्या.

मुलं १ वर्षाचे झाल्यावर रंगीत, माेठी चित्र असणारी पुस्तक वाचताना आवाजात चढ- उतार करून, हावभाव, हातवारे करत पुस्तक वाचावे. 

६ वर्षांखालील मुलांना पुस्तक वाचून दाखवताना,  प्रत्येक शब्दावर बाेट ठेवून वाचून दाखवावे. पुस्तक वाचनामुळे मुलांची शब्दसंग्रह वाढताे. भाषा सुधारते. 

६ वर्षांवरील मुलांना त्यांना आवडणाऱ्या विषयांची पुस्तके त्यांना आणून द्यावीत. यातून मुलांना वाचनाची गाेडी लागते.

राेजच्या दिनक्रमामध्ये एक वेळ खास वाचनासाठी राखीव ठेवावी. रात्री झाेपायच्या आधी, दुपारी जेवणानंतर वेळ ठरवून त्यावेळी वाचन करावे. 

 सुटीच्या दिवशी घरातील सगळ्यांनी एकत्र बसून पुस्तकांचे वाचन करावे. यावेळी काेणीही माेबाईल, टीव्ही पाहू नये. वाचनानंतर त्यावर चर्चा करावी. 

सात, आठ वर्षांच्या मुलांना लायब्ररी लावावी. ठराविक वेळात पुस्तक वाचून परत करायचे असल्याने त्यांना वाचनाची शिस्त लागते. 

मुलांना वाचनाची आवड निर्माण करायची असल्यास, त्यांच्यावर सक्ती करू नका. मुलांच्या आवडीचा विचार करून गाेष्टी, कविता, लेख अशा पुस्तकांची निवड करा. 

पालकांनी स्वत: पुस्तक वाचन सुरू केल्यास, मुलांना पुस्तक वाचा असे वेगळे सांगावे लागणार नाही. मुलंही मोबाईल नको पुस्तक द्या म्हणतील.

Click Here