या औषधाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
नोवो नॉर्डिस्क कंपनीने डायबिटीजसाठी वापरले जाणारे प्रसिद्ध औषध ओजेम्पिक भारतात लॉन्च केले आहे.
मूळतः डायबिटीजसाठी असले तरी, ओजेम्पिक भूक कमी करून वजन घटवण्यासाठीही जगभरात लोकप्रिय आहे.
शरीरातील GLP-1 हार्मोनसारखे काम करणारे सेमाग्लूटाइड भूक कमी करून शुगर नियंत्रित ठेवते.
भूक कमी झाल्यामुळे खाण्याचे प्रमाण कमी होते आणि नैसर्गिकरीत्या वजन कमी होऊ लागते.
भारतात याची किंमत- 0.25 mg - ₹2200, 0.5 mg - ₹2540 आणि 1 mg - ₹2800 ला असेल.
रुग्णाची मेडिकल हिस्टरी पाहूनच योग्य डोज दिले जातात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेऊ नये.