किंग कोहलीच्या स्टोरीवर जोकोविचचा रिप्लाय

विम्बल्डनमध्ये जोकेविचच्या मॅचवेळी दिसली विराट-अनुष्काची झलक

 विराट कोहली सध्या इग्लंडमध्ये असून  टीम इंडियाचा कसोटी सामन्यापेक्षा  त्याने विम्बल्डनमधील जोकोविच्या मॅचला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले.

विराट कोहली  पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत जोकोविचच्या मॅचचा आनंद घेताना स्पॉट झाले. 

विराट कोहलीचा विम्बल्डन लूकही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसतोय.

याआधीही विराट कोहली विम्बल्डनचा आनंद घेताना दिसला होता. २०१५ मधील त्याचा लूकही पुन्हा चर्चेत आलाय. 

नोव्हाक जोकोविच याने सोमवारी ऑस्ट्रेलियन टेनिस स्टार ॲलेक्स डी मिनौर याला पराभूत करत विम्बल्डनमध्ये १०१ वा विजय नोंदवला. 

या मॅचनंतर विराट कोहलीनं जोकोविचच्या फोटोसह मॅच एकदम मस्ट झाली, अशी स्टोरी शेअर केली होती. 

विराटची स्टोरी जोकोविचनं आपल्या इन्स्टा स्टोरीला ठेवत सपोर्ट दिल्याबद्दल विराट कोहलीचे आभार मानले आहेत. 

Click Here