चमचम करता है ये नशीला बदन... नोराचा अमेरिकेत जलवा

नोराच्या लेपर्ड प्रिंट कटआउट ड्रेस लूकवर फॅन्स झाले फिदा

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने अमेरिकन म्यूझिक अवॉर्ड्ससाठी पहिल्यांदाच हजेरी लावली आणि डेब्यू रेड कार्पेट वॉक केला.

नोराने या सोहळ्यात जागतिक व्यासपीठावर दक्षिण आशियाचे प्रतिनिधित्व केले आणि तिच्या आकर्षक लूकवर सारेच फिदा झाले.

अमेरिकन म्युझिक अवॉर्ड्समध्ये पदार्पणासाठी नोराने टॉम फोर्डने डिझाइन केलेला कस्टम सिक्विन लेपर्ड प्रिंट ड्रेस घातला होता.

या ड्रेसमध्ये नोरा खूपच ग्लॅमरस दिसत होती. नोराचा लेपर्ड प्रिंट फ्लोअर लेन्थ ड्रेस बारीक कलाकुसर केल्याने उठून दिसत होता.

तिच्या आउटफिटची डिझाइन, ड्रेसची चमक असलेली ट्विस्ट तिच्या सौंदर्याला अधिकच आकर्षक स्वरूप देत होती.

नोराच्या हॉल्टर नेकलाइन ड्रेसमधील मिड्रिफ कट आउट डिझाइन तिच्या ड्रेसला अधिकच चांगल्या पद्धतीने हायलाइट करत होते.

अभिनेत्रीने मागच्या बाजूला कटआउट डिझाइन देखील फ्लॉन्ट केले होते आणि सॉफ्ट कर्ल आणि थोडाशा मेकअपसह केस उघडे ठेवले होते.

या लूकमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत होती. नोराने या कट आउट ड्रेसमध्ये तिने तिची टोन्ड फिगरला देखील आकर्षकपणे फ्लॉन्ट केली.

अभिनेत्रीने एकाहून एक हॉट पोझ देऊन फोटो क्लिक केले. नोराचे हे फोटो आता इंटरनेटवर चांगलेच चर्चेत आहेत.

नोराचा लेपर्ड प्रिंट कटआउट ड्रेसमधील हॉट & बोल्ड लूक चाहत्यांना आवडला. सारेच या लूकवर फिदा झाले.

Click Here