मोबाईल सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. पण, संध्याकाळ माेबाईल फ्री ठेवली तर तुम्हाला हे आश्चर्यकारक फायदे नक्कीच हाेतील.
संध्याकाळी माेबाईल हातात घेऊ नका. तुम्हाला इतर गाेष्टींसाठी वेळ मिळेल. मन शांत राहण्यास मदत हाेईल. दिवसभराचा ताण कमी हाेईल.
बागेत, ग्राऊंडवर चालायला जा. निर्सगाशी नाते जाेडा. राेज एक नवीन अनुभव घेता येईल. फाेटाेत नाही, तर स्वतःच्या डाेळ्यात निसर्ग साैंदर्य साठवून घ्या.
संध्याकाळी घरात सगळे एकत्र असताना गप्पा मारा, एकत्र काम करा. यामुळे नातेसंबंध घट्ट हाेण्यास मदत हाेते. लहान मुलांचे भावविश्व खुलते.
जेवताना माेबाईल, टीव्ही बंद ठेवा. एकत्र बसून जेवा. जेवणाकडे लक्ष केंद्रित केल्याने पचन सुधारण्यास मदत हाेईल. तुमचे आराेग्य सुधारेल.
दिवसभरात अर्धा तास माेबाईल वापरू नका. तुमच्यातला फरक अनुभवा. तुमच्या विचारशक्तीवर चांगला परिणाम हाेईल. नवीन गाेष्टींचा विचार करा.
नवीन किंवा जुने छंद जाेपासायला वेळ द्या. वाचन करणे, गाणी ऐकणे, चित्र काढणे अशा क्रिएटिव्ह गाेष्टी माेबाईल बाजूला ठेवून करा.
सुटीच्या दिवशी डिजीटल डिटाॅक्स करण्यासाठी माेबाईलचा वापर करणे टाळा. ताे वेळ प्रत्यक्ष व्यक्तींना भेटून गप्पा मारा. तुमच्यात सकारात्मक बदल हाेतील.