सध्या भाज्यांचे भाव कडाडले आहेत, आठवड्यातून दोन ते तीन वेळा डाळी आणि कडधान्यांचा वापर केला तर भाजीचा प्रश्न मिटेल आणि पोषणही मिळेल.
भारतीय आहारात डाळींचा समावेश अतिशय चपखलतेने केला आहे. रोजच्या आहारात तूर आणि मूगडाळीबरोबर इतर डाळीही समाविष्ट करणे गरजेचे आहे.
डाळीत आणि कडधान्यांमध्ये भरपूर पोषण मूल्य असते. ज्यामुळे पचनसंस्था सुरळीत राहते. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी डाळी प्रथिनांचा मोठा स्रोत ठरते.
मसूर डाळ : हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी तसेच ऍनिमिया सारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरते.
काळे चणे : फायबर आणि प्रोटीनने परिपूर्ण कडधान्य आहे. डाएट करणाऱ्यांनी काळे चणे उकडून, मीठ-मसाला घालून खाल्ल्याने दीर्घकाळ भूक लागत नाही.
राजमा : मूत्रपिंडासाठी अतिशय गुणकारी कडधान्य आहे. त्यात प्रोटिन, फायबर आणि मिनरल्सचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो.
उडीद : प्रोटीन, फायबर, पोटॅशिअमने युक्त असणारी ही डाळ आहारात घेतल्याने एनर्जी वाढते.
चणा डाळ : प्रोटीन आणि मिनरल्सने परिपूर्ण असणारी चणा डाळ रक्तातील साखर नियंत्रित ठेवते.
मूग डाळ : पचायला अतिशय हलकी आणि पोषण करणारी मूग डाळ विविध पदार्थात वापरली जाते.
सालीसकट मूग : हिरवे सालीचे मूग पचण्यास हलके आणि चविष्ट असतात, याचा अधिकाधिक वापर व्हायला हवा.
तूर डाळ : तूर डाळीचे वरण रोजच्या आहारात असते, ते चवीला उत्तम आणि अनेक प्रकारच्या पोषणमूल्यांनी युक्त असते.
हिरवे मूग : प्रोटीन, फायबर, अँटीऑक्सीडन्टने युक्त आणि वजन कमी करणाऱ्यांस लाभदायी असे हे कडधान्य आहे.