निस्तेज चेहऱ्याचे तेज परत आणण्यासाठी ९ टिप्स 

तुमचा चेहरा निस्तेज झाल्यासारखा वाटतोय? काळजी करू नका, पुढे दिलेल्या ९ टिप्स अंमलात आणा आणि गेलेले तेज परत मिळवा!

प्रत्येकाच्या चेहऱ्याला निसर्गतः तेज असते, मेक अप न करताही एक विशिष्ट उजळपणा असतो, जो कालौघात नष्ट होतो. तो परत कसा मिळवायचा ते पाहू!

काही दिवस चेहऱ्यावर बेबी सोपचा वापर करा किंवा डाळीचे पीठ, दूध आणि चिमूटभर हळदीचा पॅक आठवड्यातून तीनदा लावा. रोज कच्चे दूध लावा. 

गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय असेल तर काही दिवस कोमट पाण्याचा वापर करा, निदान चेहऱ्यावर अतिउष्ण पाण्याचा मारा होऊ देऊ नका. 

रोज रात्री झोपताना खोबरेल तेलाने चेहऱ्याला सौम्य मसाज करा, जेणेकरून चेहऱ्याच्या पेशींचा रक्तप्रवास सुरळीत होईल. 

दिवसा मॉइश्चरायजर क्रीमचा आणि रात्री कोरफड जेलचा वापर करा, त्यामुळे त्वचा मुलायम राहील. 

आठवड्यातून एकदा वा दोनदा फेस मास्कचा वापर करा, त्यामुळे त्वचेचा पोत सुधारेल. 

दिवसभरात अडीच ते तीन लिटर पाणी प्या. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा जातो आणि त्वचा टवटवीत आणि सतेज दिसू लागते. 

घराबाहेर पडताना चेहऱ्याला सन प्रोटेक्शन देण्यासाठी सनस्क्रीम लोशन तसेच स्कार्फ वापरा. 

ताजे आणि घरात शिजवलेले अन्न खा, काकडी, गाजर, बीट, कांदा, फळं यांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करा. 

बाहेरचे आणि तळलेले अन्नपदार्थ तसेच गोड पदार्थांचे सेवन कमी करा, या सर्व गोष्टी केल्या तर तुमचे नैसर्गिक तेज परत मिळण्यास मदत होईल. 

Click Here