न्यू इअर पार्टीसाठी मुलांनी ट्राय करा 'हे' आऊटफिट्स
न्यू इअर पार्टीमध्ये यंदा होणार मुलांची चर्चा
सध्या सगळ्यांना वेध लागलेत ते न्यू इअर पार्टीचे. काही जणांनी तर आतापासूनच या पार्टीची तयारी सुरु केली आहे.
न्यू इअर पार्टी म्हटलं की सगळ्यांचं लक्ष जातं ते तरुणींच्या फॅशनकडे. मात्र, यंदा मुलांसाठी असे काही आऊटफिट्स पाहुयात ज्यामुळे यावेळी फक्त पार्टीत मुलांचीच चर्चा होईल.
पार्टीत जर तुम्हाला कूल दिसायचं असेल तर फॉर्मलऐवजी कॅज्युअल कपडे ट्राय करा. यात राखाडी, काळा किंवा डार्क निळा रंग ट्राय करा.
न्यू इअर पार्टीत स्मार्ट दिसायचं असेल तर वातावरणाचा अंदाज घेऊन प्लेन स्वेटर, स्वेटशर्ट किंवा ब्लेझर ट्राय करु शकता. हा लूक कॅज्युअल पँट आणि ब्रॉग्स शूजसह करा.
डेनिम जॅकेट तर ऑलटाइम स्टायलिश दिसतं. त्यामुळे डेनिम जॅकेटसह साधा लाईट रंगाचा टी शर्ट जॉगर्स किंवा कॅज्युअल स्नीकर्स तुम्ही ट्राय करु शकता.
जर तुम्हाला फॉर्मल कपडे घालायची सवय असेल तर, फॉर्मल पँट, शर्ट, कोट आणि ऑक्सफर्ड शूज असं परफेक्ट कॉम्बिनेशन करु शकता.
मध खाण्याचे अफलातून फायदे,शारीरिक तक्रारीही होतील दूर