पूर्वीचे लोक कायम सांगतात की, नवीन वस्त्र घेतलं की प्रथम ते धुवा आणि मगच वापरा.
आजकाल कोणीही या गोष्टी पाळत नाही. नवीन कपडे आणले की लगेच त्याचं उद्घाटन केलं जातं. परंतु, नवीन कपडे धुवून का घालावेत याची काही कारणं आहेत. ती पाहुयात.
कपड्यांना सुरकुत्या पडू नयेत. त्यांचा रंग, पोत व्यवस्थित रहावा यासाठी कपडे तयार करतांना त्यात काही हानिकारक रसायने मिसळली असतात. त्यामुळे काही वेळा हे कपडे न धुता वापरल्यास स्कीन अॅलर्जी होऊ शकते.
नवीन कपडे घेण्यापूर्वी आपण ते ट्रायल रुममध्ये ट्राय करुन पाहतो. परंतु, हे कपडे आपल्यापूर्वी अनेकांनी ट्राय केले असतात. त्यामुळे आपल्याला स्क्रीन प्रॉब्लेम होऊ शकतो.
कपड्यांचा रंग टिकावा यासाठी त्यावर अतिरिक्त रंगाचा मारा केला असतो. हा रंग कपड्यांच्या धाग्यांमध्ये अडकलेला असतो. ज्यामुळे या रंगामुळेही त्वचेसंदर्भात समस्या होऊ शकतात.