सध्या कॅफिन पाउचेस सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत
सध्या कॅफिन पाउचेस सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत आणि त्यांना झटपट ऊर्जा देणारे म्हणून प्रसिद्धी मिळत आहे.
हे पाउच दिसायला ग्रीन टी बॅगप्रमाणे लहान असतात, पण हे गिळायचे नसतात, फक्त १५–२० मिनिटे तोंडात ठेवायचे असतात.
पाउच तोंडात ठेवले की कॅफिन थेट गालांच्या आतील त्वचेवरून रक्तात शोषले जाते आणि परिणाम लगेच जाणवतो.
कॉफी प्यायल्यावर परिणाम उशिरा होतो कारण कॅफिन आधी पोटातून मग रक्तात पोहोचते.
कॅफिन पाउच घेतल्यावर BP वाढणे, हृदयाचे ठोके जलद होणे, घबराट, चिडचिड, झोप न येणे, डोकेदुखी आणि पोटात जळजळ यासारखी तात्काळ लक्षणे दिसू शकतात.
दीर्घकाळ वापरल्यास हायपरटेन्शन, हृदयविकार, गंभीर अनिद्रा, मूड बदल, चिंता वाढणे, दात व तोंडावर दुष्परिणाम आणि कॅफिनची सवय लागणे हे धोके संभवतात.
ज्यांना हृदयविकार किंवा BP आहे, झोपेचे आजार किंवा चिंता आहेत, तसेच गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी कॅफिन पाउचेसचा वापर अजिबात करू नये.
तज्ञांच्या मते, हे पाउचेस आधुनिक ट्रेंड असले तरी शरीरासाठी धोकादायक आहेत आणि त्यांचा वापर टाळावा.