फ्रीजमध्ये ठेवू नका 'हे' चार पदार्थ, शरीरासाठी आहेत घातक
हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवले तर त्याच्यात विषारी घटक तयार होतात.
अन्नपदार्थ खराब होऊ नयेत म्हणून ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले जातात. मात्र काही खाद्यपदार्थ त्याला अपवाद असतात. फ्रिजमध्ये ठेवल्याने ते विषारी होतात.
आरोग्य प्रशिक्षक डॉ. डिंपल जांगरा यांनी रेफ्रिजरेटरमध्ये ४ पदार्थ ठेवण्यास सक्त मनाई केली आहे. विशेषतः हिवाळ्यात या गोष्टी फ्रिजमध्ये ठेवणे अधिक हानिकारक ठरते.
सोललेला लसूण कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. त्याला लवकर बुरशी लागते. लसूण कायम गरज असेल तेव्हा सोलून घ्या. तसंच तो कोरड्या आणि मोकळ्या ठिकाणी ठेवा.
कांदे कमी तापमानाला प्रतिरोधक असतात. जेव्हा तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवता तेव्हा त्याचा स्टार्च साखरेत बदलतो. ज्यामुळे त्याला सहजपणे बुरशी लागते.
अनेक जण किसलेलं आलं फ्रीजमध्ये ठेवतात. मात्र, अशा आल्यावर बुरशी लवकर येते. परिणामी, हे आलं खाल्ल्यामुळे मूत्रपिंड, यकृत यांचं आरोग्य धोक्यात येतं.
ही चूक प्रत्येकाच्या घरात होत असते. उरलेला भात फ्रिजमध्ये ठेवला जातो. परंतु जर तुमच्याकडे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल तर तो २४ तासांपेक्षा जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवू नका.
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ८ फळं खायलाच हवीत...